गायनःमैफिली व पार्श्वगायन

'सारेगामा' या कार्यक्रमात परीक्षक अवधूत गुप्तेच्या बोलण्यात अनेकदा पार्श्वगायनाचा उल्लेख असतो. तो गाणे बहुतांश वेळा पार्श्वगायनाच्या दृष्टीने बघतो. उत्तम पार्श्वगायक बनण्याच्या दृष्टीने काय करावे, यासंबंधात तो सूचना करतो. इतर परीक्षकांच्या बोलण्यात पार्श्वगायनाच्या मुद्यावरच भर दिला आहे, असे आढळत नाही.
  • एखाद्या गायकाला जीवनात केवळ मैफिलीं करायच्या असतील व पार्श्वगायन करायचेच नसेल वा कमी करायचे असेल तर त्याने पार्श्वगायनाबाबतच्या सूचनांचा किती अभ्यास करावा ?
  • पुढील काळात केवळ मैफली करून गायकाला टिकून राहता येईल का ?
  • पार्श्वगायन अपरिहार्य आहे का ?