विदर्भ-एक ओळख

विदर्भ या विषयावर लेखन करतांना माझ्या हे लक्षात आले कि आजच्या पिढीला या बाबत कितपत ज्ञान आहे. विदर्भात जन्मलेला तरुण देखिल या बाबतित अनभिज्ञ असतांना विदर्भाबाहेरील इसमाला मिडिया कडून जे कळते तेवढेच माहित असणार आणि मिडीया काय थराची आहे ते मिडीयातील लोकांसकट सगळे जाणून आहेत.

विदर्भ म्हणजे वऱ्हाड. नागपुर मध्ये जी मराठी बोलली जाते त्याला मुख्यत्वेकरून वऱ्हाडी बोली म्हटले जाते. . नागपुर व अम्ररावती विभागाचा बनलेला हा महाराष्ट्रातील पुर्वेकडील भाग . याच्या उत्तरेला मध्यप्रदेश, पुर्वेस छत्तीसगढ, दक्षीणेस आंध्रप्रदेश तर पश्चीमेस मराठवाडा व खानदेश. भारताच्या मध्यभागात वसलेला असा हा सांस्कृतीक द्रुष्ट्या सम्रुद्ध , अतिशय सुपीक व ऐतिहासीक महत्त्व असलेला महाराष्ट्रापासून एकदम वेगळा प्रदेश. विदर्भातील सर्वात मोठे शहर म्हणजे नागपूर, त्या खालोखाल, अम्ररावती, अकोला, गोंदीया, चांदा(चंद्रपुर) आणि यवतमाळ. विदर्भातील लोक हे मुख्यत्वेकरून वऱ्हाडी बोलतात. येथील मुख्य पीके म्हणजे संत्रे व कापुस. महाराष्ट्रातील दोन त्रुतीआंश खनीज संपत्ती , तीन चतुर्थांश  जंगले ही विदर्भात आहे. त्याच प्रमाणे अधिकांश विद्युत शक्ती ही देखील याच भागात आहे. संपुर्ण महाराष्ट्रात जातीय दंगली बाबत विदर्भ हा शांत प्रदेश गणल्या जातो. पण इतके असुनही हा प्रदेश गरीबी आणि कुपोषणानि ग्रस्त आहे. अन्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आर्थीक द्रुष्ट्या अविकसीत राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने विदर्भाला दिलेली सापत्न वागणुक. व या प्रदेशातील काही मोजके नेते सोडल्यास या प्रदेशाला मिळालेले नालायक नेत्रुत्व आणि यामुळे महाराष्ट्रातील अन्य भागाच्या तुलनेत विदर्भातील शेतकरी हा अत्यंत दयनीय परिस्थीत जिवन जगत आहे. गेल्या दहा वऱ्षात महाराष्ट्रात ३२००० शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत त्यात ७०% आत्महत्त्या या विदर्भातील ११ जिल्ह्यात झाल्या आहेत. खनीजे, कोळसा, जंगले व पर्वतराजीनी सम्रुद्ध असा हा प्रदेश अविकसीत राहाण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्य महाराष्ट्रातील राजकीय नेत्रुत्वाचे वर्चस्व विशेष करून पश्चीम महाराष्ट्राचे. इतर महाराष्ट्रीय प्रदेशापेक्षा सांस्कृतीक, आर्थीक व राजकिय द्रुष्ट्या वेगला असुनही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न हा निर्माण होण्याचे कारण या भागातील नेत्रुत्वाला सरकार दरबारी कायम बाजुला सारण्यात आले व त्यांना दुय्य्म दर्जा दिल्या गेला. विदर्भ हा सर्व बाबतीत महाराष्ट्रापेक्षा सर्वच बाबतीत भीन्न असुनही केवळ  मराठी भाषीक असल्याकारणाने विदर्भ महाराष्ट्राला जोडण्यात आला. पण तेंव्हापासून विदर्भ हा महाराष्ट्राची एक वसाहत बनून राहिला ही भावना वर्हाडी मनात कायम राहिली आणि अन्य महाराष्ट्रीयांनी आपल्य सापत्न वागणुकीने या भावनेला खत पाणी घालून आज वेगळा विदर्भ या मागणीशिवाय येथील जनतेला न्याय मिळणार नाही हि भावना द्रुढ झाली.
आज या भागाचे दिसत असलेले दयनिय चित्र यापेक्षा अधिक काय दर्शविते? पश्चिम व पुर्व महाराष्ट्रातील परिस्थीतीतील असमतोल हे याचे जिवंत उदाहरण आहे.