गमती-जमती

गमती-जमती
===============
.
.
कट्टी-बट्टी खाऊची वाटी
हमरी-तुमरी लाठ्ठा-लाठी
धम्मक लाडू चापट पोळी
कधी शिमगा कधी होळी
.
अटक-मटक सर सकट
हाती येईल त्याला पटक
पोलीस दादा आला सटक
चिरी मिरीची त्याला चटक
.
ह्याचा नारा त्याची हाळी
कधी दंगली जाळा-पोळी
पोरा-सोरांना न आकळती
थोरांच्या थोर गमती-जमती
.
.
===============
स्वाती फडणीस.... २११२०९