उगवत्या प्रियकरा(विडंबन-मावळत्या दिनकरा-भा. रा. तांबे)

मावळत्या दिनकरा(भा.रा.तांबे)

मावळत्या दिनकरा;

अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा.

जो तो वंदन करी उगवत्या;

जो तो पाठ फिरवी मावळत्या;

रीत जगाची रे ही सवित्या;

स्वार्थपरायणानरा.

उपकाराची कुणा आठवण;

'शिते तोवरी भुते असे 'म्हण;

जगात भरले तोंडपुजेपण;

धरी पाठीवरी शरा.

आसक्त परी तू केलीस वणवण;

दिलेस जीवन हे नारायण;

मनी न धरले सानथोरपण;

समदर्शी तू खरा.

विडंबन १

उगवत्या प्रियकरा;

प्रेम  तुज करते मी जरा.

जो तो समजे मला तुझी प्रिया;

अन् विसरे माझी जुनी प्रेमकथा;

रीत जगाची हिच प्रियकरा;

माझ्यावर प्रेम करणाऱ्या वेड्या.

जुन्या प्रियकराची कुणा आठवण;

'पैसा तोपर्यंत प्रेम' माझी म्हण;

मला भेटले कित्येकजण;

पण तू त्यात पैसेवाला खरा.

रंक परी तू झालास दिलदार;

दिलेस माझे हॉटेलच बील;

मनी न ठेवले माझे हिशेब;

समजूतदार तूच खरा.