ब्रेडची भाजी (पाव भाजी नव्हे)

  • एक मध्यम आकाराचा कांदा
  • ७-८ ब्रेडचे स्लाइस
  • मोहरी
  • २ मोठे चमचे तेल
  • तिखट मिठ चविनूसार
  • हळद
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • कच्चे शेंगदाणे
  • लिंबू
१५ मिनिटे
२-३ जणांसाठी

प्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. ब्रेडचे स्लाइस एकावर एक ठेवून सुरीने त्यांचे तुकडे करावेत. साधारण १ सेमी लांबी रुंदी जाडीचे तुकडे करावेत.

एका कढईमध्ये तेल तापवून त्यांमध्ये मोहरी घालावी. मोहरीचा तड तड असा आवाज आल्यावर त्यांमध्ये हळद आणी कांदा आणी शेंगदाणे घालावेत. कांदा चांगला परतून घेतल्यावर त्यांमध्ये ब्रेडचे तुकडे आणी चवीप्रमाणे तिखट मीठ घालावे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून चांगले परतावे. वरतुन हवे तसे आवडीनुसार लिंबू पिळून घ्यावे.

ब्रेडची भाजी तयार !

 नाश्त्यासाठी झटपट बनवता येणारा हा पदार्थ आहे. पोहे उप्पिट खाऊन कंटाळला असाल तर जिभेला बदल मिळतो.

आवडीनुसार वरून बारीक शेव टाकल्यास वेगळीच मजा येते.

घरातील उरलेला (शिळा) ब्रेड संपवण्यासाठी उत्तम.

आई