अवहेलना

अवहेलना ही भावना असे खूप वेदनादायक

वाट्यास न येवो कोणाच्या असे त्रासदायक
करती कोणी अवहेलना ती संपत्तीच्या मदाने
पीडला जाई गरीब मग संपत्तीच्या अभावाने
अवहेलना करती कोणी पाहा सत्तेच्या धुंदीने
बदला घेई व्यक्ती,  मग शोधून संधी बुद्धीने
धर्मनिष्ठ व्यक्ती करती अवहेलना इतर धर्माची
अनभिज्ञ असती ते, तत्त्वे सर्व धर्माची प्रेमाची
उच्चविभूषित अवहेलना करती हो  निरक्षराची
असती निरक्षर तेच,पारख नसे त्याना गुणांची
अवहेलना करती कोणी,  देऊन ग्वाही प्रेमाची
कल्पना नसे त्याना प्रेम नसे गुलामी कोणाची
कोणास असे धुंदी,  आपुल्या मोहक सौंदर्याची
अवहेलना करती मग ते कुरुप ठरवून इतरांची
कोणास असे मस्ती खूप, आपुल्या पुरुषत्वाची
अवहेलना करती ते मग नारीच्या वंध्यत्वाची
कोणी असती बाहुबली, त्याना पर्वा नसे कोणाची
अवहेलना करती पीडा देऊन मग त्या सज्जनाची
कोणी करती अवहेलना मग ती सग्यांची द्वेषात
हाडवैरी बनुनी एकमेक पाहती मग ते पाण्यात
काय मिळते अवहेलना  करून  कोणास कोणाची
आसुरी आनंदात जगणे नसे सांगता या जन्माची
सुंदर जीवन दिले असे हे परमेश्वराने आपणास
व्यतीत करा जीवन प्रेमाने विसरून अवहेलनास