शिशिर

सरताच  चांदणे  शरदाचे, चाहुल  लागे शिशिराची

बदल घडत असे या  अवनि, पाने  गळती  वृक्षाची
होताच सुरू शिशिर, श्र्रूंगार आपुला त्यजे वसुंधरा
पाहुनी रूप स्वाध्वीचे त्या, दुःख होतसे मनमयुरा
वाढे  कडाका  थंडीचा  ह्या,  धुके  पसरते रस्त्यात
वाट न  दिसे समोरची,  लुकलुकती  दिवे  मार्गात
पांघरून दुलई  अंगावरती, वाटे  पडावे अंथरुणात
उबेत झोपून मस्तीत, वाटे फिरावे  गोड स्वप्नात
धाडस करती कांही  जन, उठून फिरण्याचे  थंडीत
लेऊनी शाली अन स्वेटर, घेती  आनंद  फिरण्यात
वृक्ष छाटती अनेकजण, करुनी वृक्षास त्या  विद्रुप
विषण्ण, उदास होई मन,पाहुनी तरुचे ओंगळ रुप
उब आणण्या शरीरास,शेकोटी पेटवती जन अनेक
प्रदुषण वाढवती  हवेत,  आनंद घेतात ते क्षणिक
उदय होतसे भानुचा,  न्हाऊन निघते उन्हात धरा
उत्साह संचारे शरीरी,वंदन भानूस असे दोन्ही करा