पोळीचा चिवडा - २

  • शिळ्या पोळ्या
  • फोडणीचे साहित्य
  • तळलेले दाणे
  • कढिलिंब
  • तयार गरम मसाला (पावडर)
  • मीठ, साखंर
१५ मिनिटे

१) पोळी बारिक कुस्करून घेणे. किंवा वाटणयंत्रातून (मिक्सर) हलकेच फिरवून घेणे (व्हीप बटण).

२) जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढिलिंबाची पाने घालून मग पोळी घालणे.

३) थोडी साखंर, मीठ, गरम मसाला घालून नीट ढवळून घेणे.

४) आता मंद आचेवर ठेऊन देणे. अधून-मधून ढवळणे.

५) पोळी खरपूस दिसायला लगली की गॅस बंद करणे. वरून दाणे टाकून ढवळणे.

६) तसाच गार होउ देणे.

चविष्ट , कुरकुरीत, खमंग चिवडा तयार..!

२ दिवस सहज टिकतो.

सौ. आई