नंदलाला

कधी श्वास हे ऐकू येतसे जैशी रुणझुण नूपुराची,

कधी दूर कुठेशी, कधी जवळी जैशी चाहुल मृगजळाची

बसता मी एकटी कधी वाजे पावा कुठेतरी

सुंदर मोहक मंद गंध हा कधी जाणवे कुठेतरी

स्वप्न की सत्यात आहे? मजला कसले भान?

त्याच राउळी जगते मी, मनी फ्क्त तेच ध्यान

डोळे मिटता दिसे फ्क्त ती मोहक तुलसीमाला

मोरपिसाची शोभा वाढवी उभा समोरी तो नंदलाला

प्रेम म्हणावे हे माझे की भक्ती ती निस्सिम

त्याच्यासाठी वेडी झाले अंतरी मी सुखासीन

नको छळू रे तू गोपाला, ये आता निघोनी झणी

घेईन लोळण तुझ्याच पायी मी बावरी तत्क्षणी!!!