कविवर्य भा. रा. तांबे यांची" मावळत्या दिनकरा"या वरील विडंबन.
" खा खा रे प्रियकरा"
खा खा रे प्रियकरा
विनवी तुज जोडुन दोन्ही करा
स्वयंपाकाची मला न शिकवण
उगी नको तू लावू भुणभुण
वरण-भात हा घेई खाउन
जा ऑफिसला त्वरा ।
पोळी-भाजी मला न जमते
केंद्रातून ती मी मागवते
डब्यात तुजला ती मी देते
खाउन घे ती जरा ॥
ऑफिसातुन तू येता परतून
हॉटेलात मग जाऊ आपण
पदार्थ खाऊ विविध मागवून
बेत किती हा बरा ॥
अनंत खोंडे. पुणे.
२८ डिसे.२००९.