आकाशगाणे
==========
.
.
कुठूनी टपकते
कसे बरसते
पापणीआडचे
पाणी खारे
कुठूनी झरते
कसे ओघळते
मना मनातले
जीवन गाणे
.
कुठेसे ठरते
कसे दडते
शिंपलीतले
ओजस दाणे
कुठेसे उडते
कसे कोरडते
गालावरचे
आभाळ ओले
.
इकडून तिकडे
बागडती जसे
कमल दलावर
थेंब टपोरे
पालटत राहावे
हातांनी तसे
सुख-दुःखांचे
नित्याची ओझे
.
या हाताने
त्या हातीचे
टिपून घ्यावे
भाव सारे
या ओठांने
त्या ओठीचे
गात जावे
आकाशगाणे
.
.
==========
स्वाती फडणीस
२८१२०९