काम

मनुष्याचे असतात बरका प्रमुख शत्रू सहा

काम असतो त्यात फारच विघातक पाहा
काम म्हणजे असते ते सुखद इंद्रिय सुख
अटक लागताच याची, होते त्याचे प्रभुत्व
सुरवातीस वाटते यात सुंदर हे स्वर्गसुख
अतिरेक होताच याचा, बनते जहाल वीख
लग्न होताच बुडतो, तो संपूर्ण कामसुखात
ताबा घेई पत्नी त्याचा, ठेवी त्यास कह्यात
विसरतो सर्व नाती तो, अशा कामसुखात
आश्चर्य करती आईबाप,पुत्र कसे बदलतात
वेगळे थाटतो घर, ठेवतो पत्नीला सुखात
घेतो मग कामसुख पत्नीसमवेत मनसोक्त
पत्नी करे टाळाटाळ, जर कामसुख देण्यात
शोधतो नवीन घरोबा, घेण्यास सुख निवांत
उधळतो मग सारी दौलत तो कामसुखात
बनतो फकीर, येई रस्त्यावर नसे शुद्धीत
लागती व्यसने धन मिळवण्यास अनेक
घालवती प्रतिष्ठा आपुली पण हो कित्येक
जीवन बरबाद करे कामसुखाचा अतिरेक
अक्कल येई त्यास लागताच व्याधी अनेक
पश्चाताप होण्या आधी ठेवा मती शाबुत
सुरवाती पासून ठेवा कामसुखास काबूत