करशील का पुरे.....
रोज संध्या व्हावी तेव्हा ,
मी व्हावा असा का गं वेडा ?
मनात माझ्या तुझेच स्वप्न,
तुझाच मज का जडावा छंद ?
तू यावी अंगणात माझ्या,
दरवळावा सर्वत्र सुगंध मोगऱ्याचा।
होताच स्पर्श मला तुझा सुखाचा,
गुलाब फुलावा माझ्या दिलाचा।
चुंबताच रसाळ ओठ तुझे,
ओठावर पसरावा मकरंद माझ्या।
तू यावी अशी कुशीत माझ्या,
विसर पडावा मज साऱ्या जगाचा।
येऊन माझ्या जीवनात तू ,
बहारदार बनवशील का जीवन माझे?
होवून माझ्या प्रीतीची रानी,
करशील का पुरे हे स्वप्न मनाचे?