वर्ष २००९

आलेख मांडिला आहे हो गतवर्षीच्या घटनांचा

उजाळा द्या हो,  आपुल्या मतीला, आठवणींचा
घडल्या कांही सुखद घटना,  गेल्या वर्षभरात
आनंद घेऊ त्याचा, जाण्या आधी विस्मरणात
केला सत्कार श्री. भीमसेन जोशींचा राष्ट्रपतीने
गौरविले  त्याना ' भारत रत्न ' या पुरस्काराने
संगीतातील अंतर्देशीय पुरस्कार ग्रॅमी नाव असे
उस्ताद झाकिर हुसेन, यांनी तो मिळवला असे
अंतर्देशीय पुरस्कार ऑस्कर चित्रपटासाठी असे
'स्लमडॉग मिलिनिअर'ने मिळवली आठ बक्षिसे
भारताचा  मानाचा पुरस्कार असे  फाळके  यांचा
मान मिळाला'मन्ना डे' याना त्यासाठी यावर्षीचा
पुण्याच्या कृष्णा पाटील हिने घडवला इतिहास
एव्हरेस्ट हे उच्चशिखर केले पादाक्रांत झकास
भारताची शान  वाढवे , सचिन  क्रिकेट  जगतात
तीसहजार धावा अन ४३ वे शतक ठोकले झोकात
कमाल केली साईनाने हो, या बॅडमिंटन क्षेत्रात
अजिंक्य झाली, करुनी  धमाल  इंडोनेशियात
भारतास मिळाले प्रथम नांमांकन हो कसोटीत
शान राखली भारताची, क्रिकेट संघाने  मजेत
सुखद घटनासवे कांही दुःखद घटना घडल्यात
सांवट त्याचे असे मनावर, प्रत्येक भारतीयात
झाले निधन, निळू फुले  या  श्रेष्ठ अभिनेत्याचे
होते ज्येष्ठ समाजसेवक थोर, ते स्वच्छ मनाचे
सोडून गेल्या ज्येष्ठ गायिका  गंगुबाई  हनगळ
व्यक्त  केली महाराष्ट्राने त्या  गेल्याची हळहळ
होते प्रयोग शील ज्येष्ठ संगीतकार महान एक
भास्कर चंदावरकरसाठी,  हळहळे हो  प्रत्येक
'आहे मनोहर तरी' लेखिका  सुनीता  देशपांडे
गेल्या ठेवून, त्यांचे वेगळे अस्तित्व हो  बापुडे
वैशिष्ठ्यपूर्ण  कांही घटना घडल्या या   वर्षात
अवलोकन  करू  या, त्याचे  आपण ते  हर्षात
झाले  भारतीय चंद्रयानास, पूर्ण  शंभर दिवस
सुरळीत चाले चंद्रयान, श्रेय असे ते शास्त्रज्ञास
एक लाखाची,नॅनो  मोटर, आली  हो  टाटांची
स्वप्नपूर्ती  केली, सामान्य जनाची मोटारीची
वीरगती प्राप्त  झाली  हो, शहीदांना  लढताना
संम्मानीत केले  देऊन किर्ती, अशोक चक्रांना
पार पडले असे हे गतवर्ष,अशा अनेक घटनांनी
स्मरुया घटना, ज्या  भरल्या हो सुखदु:खानी