आयुष्य हे असच असतं,
कधी फुंकर तर कधी वादळ असतं.
कधी सुखाची शाल ओढून,
दु:ख दबकत येत
तर कधी दु:खाचे काटे लावून,
सुख धावत येत.
सुखाचा उपभोग घेताना,
दु:ख कधी आलं हे कळत नाही
अन दु:खाचे काटे टोचत असताना,
सुखाची वाट साहवत नाही.
सुख नेहमी पाहुणा बनून येत,
दोन दिवस राहून लगेच निघून जातं
दु:ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
अन हृदयाला चरे पाडून जातं.
पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.
प्रसाद भगवंतराव कुलकर्णी.
औरंगाबाद.