आनंद उमाळा
=================
.
.
कोणत्या शब्दात सांग मांडू,
अलौकिक या क्षणाला..
मोजका शब्द संभार माझा,
तोडका वर्णाया सुखाला..
.
आनंद उमाळा असा अंतरी,
तेवल्या प्रकाश माला..
विझुनी जाता तिमिर सावल्या,
सोहळा अखंड झाला..
.
ओठांवरचा वाद हरवला,
मौनरंगी देह दंगला..
श्वास श्वास सुमधुर पावा,
हृदयी हुंकार जागला..
.
आनंद उमाळा असा अंतरी,
तेवल्या प्रकाश माला..
कोणत्या शब्दात सांग मांडू,
अलौकिक या क्षणाला..
.
.
=================
स्वाती फडणीस....... ०४०११०