स्वप्नपूर्ती

सांग मजला रे मना,

स्वप्नपूर्ती माझी होईल का?
रंगवलेले जीवनचित्र माझे
साकार कधी होईल का?
मी अशी स्वप्नवेडी
राजकुमार मज मिळेल का?
मी अशी खूप हळवी 
समजून मजला घेईल का?
ओढ मजला ना धनाची
आवड माझी समजेल का?
मी भुकेली असे प्रेमाची
प्रेम मज भरपूर देईल का?
तन, मन समर्पित प्रियास 
इच्छापूर्ती माझी होईल का?
प्रतिसाद त्याचा तितकाच हवा
स्वप्नपूर्ती माझी होईल का?