मजवरी तुझे किती आळ होते

तुझी नजर अजुनी मला हेटाळीत राहते;

सांग ना मजवरी तुझे किती आळ होते.

कळते पाठलाग करता तुझ्या सावलीचा;

तू माझा असणे जुने काळ होते.

प्रेमाचे निखारे अजुनी धगधगत होते;

कारण तुझे श्वास भात्यात होते.

सोसायचे किती तुझ्या दुराव्याचे काळ होते;

का तुझ्यासाठी माझे जगणेच गाळ होते.

झाली आज हे जरी निर्माल्य माझे;

तरी फुलांचे सुवास तुझ्यासाठीच होते.

तुला फक्त दिसते माझे मनमुराद हसणे;

का कळत नाही तुला माझे मुक्यानेच रडणे