कल्लोळ पुन्हा भवताली

गुर्मीत वासनेच्या;

मी वस्त्र तिचे फेडले;

नको ती म्हणाली;

मी हवे तेच केले.

तिच्या जोडल्या हातांना;

टाळीत मी गेलो;

तिच्या सर्वस्वाची होळी;

जाळीत मी गेलो.

मी शांत होताना;

निःशब्द ती झाली;

झेलू कशी आता;

जगाची वल्गना म्हणाली.

डोळ्यांसमोर आत फक्त;

मृत्यू तिचा वाली;

विहिरीत त्या स्वतःला;

केलं तिने हवाली.

येताच त्या आठवणी;

जखम पुन्हा ओली;

मी पश्चात्ताप न केला;

कल्लोळ तोच भोवताली.