देवीची आरती

जयदेवी जयदेवी, जय लक्ष्मीमाता

आरती ओवाळू तुज जगदंबा माता
मनोभावे ग माते,तुजला आळविता
प्रसन्न तू होशी,  कृपा करसी भक्ता
जनी त्रास देण्या, दानव येती जगता
मुक्ती देण्यास दुःखा, तूची असे त्राता
तूची लक्ष्मीमाता, तूची भवानी माता
रेणुकामाता तूची, तूची सप्तश्रृंगीमाता
असती अनेक रुपे, तुझी या जगती
दानव संहार करसी, प्रत्येक रुपाती
भक्तीभावे पूजता, तुजला लक्ष्मीमाते
सुख, समृद्धी देशी, भक्ता कृपा हस्ते
कृपावंत व्हावे, मजवरी लक्ष्मी माते
विनवतो तुजला पामर,जगदंबे माते