सखीची आठवण...

सखीची आठवण.....

सखे, तुझी आठवण
मनाच्या कुपीतली साठवण
कधीतरी कुपी उघडतो...
आठवणींचा सुवास दरवळतो !

वाऱ्याची झुळुक...येते जाते
आठवण सखीची हुळहुळते
कधीतरी मनाचे पोळे फुटते...
आठवणींचा मध ठिबकत राहतो !