मी August २००८ मध्ये साताऱ्यात गेलो असताना तेथील प्रसिद्ध किल्ल्यावर "अजिंक्यतारा" अशी पाटी वाचली. त्यावर कविता रचण्याचा हा प्रयत्न.
उभा आहे मी इथे कित्येक सहत्र शके
झेलीत ग्रीष्मज्वर अन पावसाळी धुके
घेतलाय इथल्या प्रत्येक हृदयाचा ठाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?
घेतलंय मिठीत संपूर्ण सातारा शहर
आणि पाहत आलोय इथल्या प्रत्येक वसंताचा बहर
सगळेच बोलतात माझ्याशी आयुष्याची धूप-छाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?
चार भिंती, यवतेश्वर आणि कास रोड
फिरून फिरून पायाला आले असतील फोड
इथे आणून मैत्रिणी वर मारला असेल भाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?
आज जे म्हातारे इथे संध्याकाळी फिरले
लहानपणी तेही माझ्या अंगा खांद्यावर खेळले
इतकं जिव्हाळ्याच नात, मग बस का राव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?
परवा आला कोणीतरी, अन लावून गेला पाटी
एकच गोष्ट कळली नाही, ती आहे कुणासाठी?
माझ्या नावाची पाटी लावून कुणी स्वतःचा प्रचार केला
आणि परत एकदा जनतेचा पैसा, वाया गेला...
read more @ http:\\www.mazikalpana.blogspot.com