आनंद सागर
===============
.
.
लाट सुखाची येते जाते..
भिजती कोरडती किनारे,
येता जाता रेखून जाते..
रजत किनारी लय ललकारे...!
.
लाट सुखाची येते जाते..
गाती बिलगती सागर वारे,
गाता गाता वाहून जाते..
रजत किनारी फेण फुलोरे...!
.
लाट सुखाची येते जाते..
नाचती खेळती नभ तारे,
कणा कणात माळून जाते..
रजत किनारी सौख्य सारे ...!
.
लाट सुखाची येते जाते..
आनंद सागरी भरते न्यारे,
कला कला ताडून जाते..
रजत किनारी आनंद विहरे..!
.
लाट सुखाची येते जाते..
.
.
===============
स्वाती फडणीस... ११०११०