तिळगुळ घ्या गोड बोला

तिळगुळाची घ्यावी  तुम्ही वडी

मिसळली त्यात स्नेहाची गोडी
चाखावी  हो  आपुलकीही थोडी
सुटतील हो जीवनातील  कोडी
तिळगुळाचे नाते असते ते अवीट
स्नेह प्रेमाची जोडी कशी  चिवट
वाढते स्नेहरज्जूने पक्की घसट
नाती असती आपुलकीची अतूट
मनामनातील अशी  गोड नाती
स्नेहबंधनात कशी  ती  वाढती
तिळगुळाची आहे मोठी महती
वाढवतात नात्यात गोडी किती
सण एकच असा आहे संक्रांत
मिटवी द्वेष, मत्सर तो मजेत
वाटप करा तिळगुळाचे जनात
स्नेह सर्वात वाढवा हसत हसत