पचडी

  • 200 ग्रॅम पानकोबी, 50 ग्रॅम गाजर, थोडी कोथिंबिर
  • 15 ग्रॅम दाण्याचे कूट, अर्ध्या लिंबाचा रस, चवीपुरती साखर, चवीपुरते मीठ, 1 हिरवी मिरची
  • हवी असल्यास फोडणीतली गोडनिंबाची पाने, लसणीच्या 3-4 पाकळ्या
  • शक्य झाल्यास अर्धी मूठ डाळिंबाचे दाणे
१५ मिनिटे
३ जणांसाठी

कोबी अगदी बारीक चिरून घ्यावी. गाजर किसून घ्यावे. कोथिंबिरीचे कोवळे देठही बारीक चिरावेत आणि पाने कात्रीने कापून वेगळी ठेवावीत.

वदनी कवळ घेण्याच्या 2 मिनिट आधी चिरलेल्या कोबीत व गाजरात दाण्याचे कूट, लिंबाचा रस, डाळिंबाचे दाणे बारीक चिरलेले कोथिंबिरीचे कोवळे देठ आणि गोडनिंबाची फोडणीतली पाने चुरडून हलक्या हाताने पण नीट मिसळावीत. मिरचीचे तुकडे आणि लसणीचे तुकडे घालावेत. वरून कोथिंबिरीचे पाने टाकावीत आणि थोडे डाळिंबाचे दाणेही.

आमटीभाताबरोबर किंवा नुस्तीही छान लागते. 

पचडी करून बराच वेळ झाल्यास तिला पाणी सुटून ती पचपचीत होते. म्हणून ती जेवणाच्या 2 मिनिट आधी मिसळावी.

 

पचडीत कोबीसोबती गाजरच काय मेथी, पालक आदि पालेभाज्याही टाकून बघ्यावात. मी लिंबाऐवजी बारीक किसलेल्या कैरीचाही उपयोग केलेला आहे. अगदी थोडी कच्ची पपई, खजूरही वापरला आहे.

आईने शिकविले, मी प्रयोग केले