तीळ महागले, गुळ पण महागला
महागाईचा भडका, देशात उडाला
कसे विनवू मी, आज संक्रातीला
तीळगुळ घ्या,अन गोड गोड बोला
महागाईने केले आहे, जीणे वैराण
प्रत्येक नागरिक झाला कसा हैराण
तरी करतो तो साजरा संक्रांत सण
आहे हा स्नेहाचा, मंगलदायी क्षण
बोलाचाच देऊ हो, आज तिळगुळ
थट्टा करे सरकार जनतेची केवळ
विसरून हा कसोटीचा हो काळ
सारे म्हणुया घ्या, हाच तिळगुळ