साबुदाण्याची खिचडी---साठवणीची

  • साबुदाणा
  • शेन्गदणा कूट
  • जीरा पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • साखर
  • तेल अगर तुप
  • व्यन्जन--बटाटा /काकडी /भोपळी मिरची /भेण्दी /रताळे /लाल भोपळा--ऱ्य पैकी काहीही
  • हिरवी मिरची
  • कोथीम्बीर /खवलेला नारळ
५ मिनिटे
साठवून ठेवायची असल्या मुळे कितीही जणाना

साबुदाणा नेहमी प्रमाणे ५ ते ६ तास भिजवून ठेवा --दोन तीन वेळा धुतल्या वर पाणी त्यावर १ ते २ मिली मी राहील एव्हढे पाणी हवे--आणि दोन तीन तासाने साबुदाणा ढवळा --खाली वर करा

हा साबुदाणा एका ताटा त ओता त्या मध्ये  जिरा पावडर, तिखट, मीठ, साखर, घालून ढवळा -त्यावर तेल वा तुपाची जिरा, हिरव्या मिरच्या चे तुकडे घालून थंड केलेली फोडणी ओता आणि ढवळा -त्या मध्ये दाणाकुट घालून ढवळा . एका बंद डब्यात भरून ठेवा 
ही झाली टिकाऊ खिचडी-- फ्रीज बाहेर हवामाना प्रमाणे २ ते ४ दिवस टिकते -फ्रीज मध्ये ८ ते १० दिवस आणि डिप फ्रीज मध्ये कितीही
खाण्यासाठी हे मिश्रण घ्या त्यावर पाण्याचा स्प्रे मारा आणि मायक्रो मध्ये १ते २ मी हाय वर गरम करा -मध्ये एकदा ढवळा एक मी नंतर
व्यंजन घातले तर ते तेल तुपात परतून घाला आणि मग ते व्यंजना सहित मिश्रण मायक्रो मध्ये एक दोन मी गरम कर मध्ये एकदा ढवळून.
व्यंजन आधी पासून घातले तर टिकाऊ पणा नाहीसा होतो --फक्त डिप फ्रीज मध्ये च टिकेल -पण चव उतरू शकते 
खिचडी सारखी सारखी गरम केली तर वातड होते . त्यामुळे बरीच खिचडी करायची झाल्यास वरील प्रमाणे जास्त खिचडी करून लागेल तशी मागणी प्रमाणे ही खिचडी गरम करून वाढा 
बंद डब्यात नाही ठेवली तर साबुदाणा सुखत जातो फ्रीज मध्ये 

साबुदाणा चांगला भिजवणे हे महत्त्वाचे आहे . नारळ घातल्यास टिकवू पणा कमी होतो. दाणाकुटाचे प्रमाण बऱ्या पैकी असावे . तेल /तुपाची फोडणी न घातली तरी खिचडी माय्क्रो मध्ये होते -पण दाणा कुट जास्त असावे त्या वेळी 

स्वयम प्रयोगातून