विडंबनास माझ्या, वेदांत मानिले मी

मूळ:

मेल्यावरी जगाचे, आभार मानले मी
जाऊ दिले मला हे, उपकार मानले मी

आयुष्य संपतांना, इतुकीच खंत होती
काही भिकारड्यांना, दिलदार मानले मी

आणि,
प्रत्येक आरतीच्या, तबकात मीच होतो
प्रत्येक तोतयाला, अवतार मानले मी....

राहुल उवाच:

पैदा होता क्षणीच, टाहो न फोडला मी
पार्श्वावरी आघात, सहजेच सोसला मी

आयुष्य संपताना, कुठलीच खंत नाही
विडंबनास माझ्या, वेदांत मानिले मी

आणि,
प्रत्येक भ्रष्टतेचा, अवतार मीच होतो
कित्येक सज्जनांना, तडीपार धाडले मी...