दिली सुदृढ शरीरसंपदा छान
तसेच विवेक,बुद्धी आणि मन
देवाने केली, कृपा ती महान
कृतज्ञता व्यक्त करा मनोमन
जे नाही जवळी तुमच्याकडे
करा तक्रार त्याची, देवाकडे
मात्र आहे जे, तुमच्याकडे
कृतज्ञता दाखवा ती देवाकडे
कृतज्ञता असे, सुंदर साबण
धुवून काढी, अहंकाराचे क्षण
कृतज्ञता असावी हृदयस्पंदन
देणाऱ्यास न विसरता वंदन
असते घरात ते धार्मिक पूजन
करतो वडिलांचे आपण चिंतन
मागतो त्यांचे, आशीर्वाद धन
दाखवा कृतज्ञता करुनी वंदन
कृतज्ञता पूर्वक, जगणे जीवन
अनुभूती असे, पाहा विलक्षण
मिळेल सुखशांती व समाधान
होईल तुमचे कृतार्थ हे जीवन