तुला वाटायचे ते वाटून गेले

तुला वाटायचे ते वाटून गेले
मला सांगायचे ते राहून गेले,
तुझ्या माझ्यातले अंतरच
बरेच काही साधून गेले... ||धृ||
न घेता आला मला तुझ्या मनाचा ठाव
न कळले तुला मज मनीचे भाव,
मुसळधार पावसात ना दिसले
दोन अश्रू माझ्या डोळ्यातले... ||१||
झालो ना कधी मी तुझाच एक भाग
कळले न तुला ही माझे हि रंग-राग,
बेसुर तुलाच वाटले
गाणे तुझ्यासाठी गायलेले... ||२||
आता अखंड असा मी आकंठ झुरतो आहे
भळभळत्या जखमेसाथी तेल मी मागतो आहे,
तू गेलीस... तू गेलीस तुझ्याविना गे
हे जीवन ही ओझे झाले... ||३||