पाहिले मी त्या सुंदर अमेरिकेत
विधवाविवाह चालती हो जोरात
होतात किती विवाह उतारवयात
घालवती उर्वरित काळ ते मजेत
गेला असे अवेळी साथीदार निघून
एकलेपणाची दाहक आग लावून
उणीव उत्कट सहवासाची भासून
करती पुनर्वीवाह, मंडळ गाठून
गेल्यावर जीवनसाथी तो निघून
आधार नसतो, कुणाचा हटकून
गेली असती मुले, संसारात रमून
भावना असुरक्षिततेची जाई ग्रासून
उतारवयात गरज मैत्रीची मानसिक
घालविण्या एकांत असे भावनिक
भेटीतून होई मित्रांशी जवळिक
होई जीवन सुखाचे असे तो रक्षक
वाटे मजला आजच्या या मितीस
अमान्य असे ही गरज समाजास
असे तो रुढीप्रिय व कर्मठ खास
अन्याय करे वृद्धा, धरून वेठीस