फर्मास फरसाण रायते

  • एक वाटी फरसाण
  • १ कांदा बारीक चिरून
  • १ टोमॅटो बारीक चिरून
  • दही फेटून
  • १ - २ मिरच्या बारीक चिरून (आवडत असल्यास)
  • चिरलेली कोथिंबीर
५ मिनिटे
दोन ते तीन माणसांसाठी

पावसाळ्यात किंवा कुंद हवेत घरातील फरसाण अनेकदा मऊ पडते. असे फरसाण खायला घरचे सहसा नाखूष असतात. त्यावेळी हे झटपट होणारे रायते बनवून त्यांना आश्चर्याचा एक स्वादिष्ट धक्का देता येईल. बनवायला खूप सोपे असल्याने कोणीही बनवू शकते.

फेटलेल्या दह्यात वरील सर्व साहित्य एकत्रित करावे व नीट मिसळावे. तुम्हाला जर कुरकुरीत रायते हवे असेल तर अगदी आयत्या वेळी मिसळावे. पण जर फार चावायला नको असेल तर आधी मिसळावे व फरसाण मऊ झाल्यावर वाढावे. मजा म्हणून किंवा चवीत बदल म्हणून हा प्रकार करायला काहीच हरकत नाही. फरसाणात मुळात मीठ असल्याने वेगळे मीठ घालायची गरज नाही, पण आवश्यकता वाटल्यास थोडे मीठ वरून घालावे.

ह्या रायत्यात तुम्ही मोड आलेली कडधान्ये मिसळून त्याचे पोषणमूल्य अधिक वाढवू शकता. तुम्हाला आवडतील त्या भाज्याही (जसे गाजर, काकडी इत्यादी) घालू शकता.

प्रयोग