हास्य

सुखी जीवनाचे असते एक गमक

हास्य असे रामबाण उपाय अचूक
जागे व्हा स्मित वदनाने दररोज
नमस्कार करा परमेश्वरास रोज
समाधान वेगळेच मिळेल तुम्हांस
दिवस हा जाईल  आनंदात खास
चेहऱ्यावर ठेवा तुम्ही हास्यभाव
मात्र नको त्यात गर्व, कुत्सितभाव
हास्याचे तुमच्या उमटेल प्रतिबिंब
जाणवेल बघुनी दुसऱ्याचे मुखबिंब
टाळा कटू प्रसंग तुम्ही असे अनेक
मात करा त्यावर विनोदाने प्रत्येक
प्रत्येक नाण्यास असतात बाजू दोन
असते एक वाईट, दूसरी  ती  छान
विचार करा फक्त चांगल्या बाजूचा
जो देईल विश्वास तुम्हा आनंदाचा
आपण असाल जर खरोखर आनंदित
दुसऱ्यास ठेवाल निश्चितच सुखात
सृष्टीचा नियमच घ्यावा समजाऊन
जशी क्रिया तसे  होईल  परावर्तन