शिळ्या पोळ्यांचे आलूपराठे

  • शिळ्या पोळ्या
  • उकडलेले बटाटे
  • आले,लसुण,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या,कोठिम्बीर,मिठ,लिम्बुरस याची चटणी
  • तेल
  • सॉस किवा लोणी
  • बारिक चिरलेली कोथम्बीर
५ मिनिटे
प्रमाण नाही

बटाटे किसून घ्या आणि त्या मध्ये वरील हिरवी चटणी घाला, चिरलेली कोथिंबीर घाला आणि मळून छोटे गोळे करा

शिळी पोळी उघडा आणि अर्ध्या बाजू वर थोडी चटणी पसरा आणि बटाट्याचा गोळा पसरा नंतर घडी घाला 
तव्या वर तेल घालून मंद ज्वाळे वर परता
लोणी अगर सॉस सह खा

पोळी जर ताजी असताना , थंड झाल्यावर , डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवली तर महिना भर पण टिकते --पण एक घडी करून ठेव , चौघडी नको

वर लिहिलेली हिरवी चटणी अगोदर तयार करून महिना भर फ्रीज मध्ये टिकते
स्वतः केलेला प्रयोग