फुटपाथ त्यांचे घर
ते जगणारे रात्रीच्या रस्त्यावर
अपरात्री बाराचे काटे मोजणारे
तुमच्या गुलाबी रजईत सारखी
गुलाबी स्वप्ने ते रस्त्यावर पाहणारे ॥
ही अशी निद्रा कुठेही पछाडलेली
माणसाला ग्रासलेली भुतासारखी,
रस्त्यावर घर करून ती नव्याने
आपल्या नशिबाची वाट पाहणारी ॥
तुम्ही भले चाललेले त्याच
रस्त्याचं फुटपाथ करायला,
दोन रुपयाचा गु-टखा खावून
लाले-लाल, पचा-पचा थुकायला ॥
तो त्यांचा स्वप्नांचा बंगला
एका रातिसाठी इथे सजलेला,
नव्या सुर्याचं, नव किरण घेऊन
पुन्हा तुमच्या वाटेत विझलेला ॥
तुम्ही जगणारे चार भिंतीची
सुरक्षा असलेल्या त्या घरात,
हे जगतात स्वतःच सुरक्षा बनून
ह्या वाटेवरल्या ह्यांच्या घरात ॥
आनंद राजगोळे