व्यसन

देवाने दिले असे सुंदर जीवन

विदीर्ण करते त्यास हे व्यसन
असते कुणास  तंबाखु व्यसन
उजाडता करतात पंचम सेवन
कुणास तल्लफ ही सिगरेटची
बाहेर जाऊनी आग ओकती
जवळी करे कुणी मद्यप्याला
वाटे कमी करे तो दुःखाला
खेळुनी कुणी जुगार पत्याचा
वेळ, पैसा घालवती घामाचा
मागे लागती कुणी रतीच्या
स्नान करती नावे कुळाच्या
जवळी करती कुणी अफूला
टाळी लागे ती ब्रह्मानंदाला
कुणी आजमावे नशिबाला
पैसे लावती रेसच्या घोड्याला
कुसंगत  ही  भोवे  कोणाला
गंमती करता  धरे व्यसनाला
व्यसन वाढतसे दिवसाला 
करुनी  बरबाद  जीवनाला
शरीर स्वास्थ्य जाते स्वतःचे
तसेच जाई स्वास्थ्य कुटुंबाचे
बरबादी येतसे चोर पावलाने
धुळदाण करी आपुल्या परीने
पाहुनी व्यसनाचे असे सोंग
मनात येतसे खूप हे  तरंग
का करती जवळी व्यसनाला?
विसरण्या क्षणभर दुःखाला?
खरेच असे का कमकुवत मन?
नसते शक्ती ही प्रतिकारासम
वाढवण्या सामर्थ्य ह्या मनाचे
सत्संग हाच उपाय मला सुचे