===================
.
.
शंभर मरणे जगून "मेला"
मुडद्यासम जगला..
या असल्या असण्याने
कसा तो ? आत्मघात ना घडला...
.
कढ कंठी दाबून हसला
विदूषकासम दिसला..
या असल्या हसण्याने
कसा तो ? आत्मघात ना घडला...
.
मन मारले, स्व घोटला
देह मात्र उरला..
एक त्यागता देह एकला
कसा तो? कोलाहल उडला.....!!
.
.
===================
स्वाती फडणीस ........ ०२-०२-२०१०