गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या
कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या
गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल
विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण
करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर
वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व
भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?        

दुवा क्र. १दुवा क्र. २दुवा क्र. ३

पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये."

धन्यवाद!

अरुंधती कुलकर्णी 

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. ४