तुझा मी दिवाणा ..

तुझे लाजणे की मला हा उखाणा,

सखे आज पुरता मी झालो दिवाणा....

तुझे मुग्ध बसणे, असूनी न असणे,

मनाच्याच आरश्यांत, पाहून हसणे,

जणू हा मला मोहण्याचा बहाणा,

सखे आज पुरता मी झालो दिवाणा....

असे काय होते, मनाच्या तळाशी,

लपेटून घेता, तुला बाहुपाशी,

नुरे भान माझे न उरतो शहाणा,

सखे आज पुरता मी झालो दिवाणा....

तुझे काय जाते, तुझा खेळ होतो,

तुझ्या ह्या अदांनी, मी घायाळ होतो,

कसा प्राण जातो न कळतेच बाणा,

सखे आज पुरता मी झालो दिवाणा....