खेळ चांदणीचे

बरे झाले त्यांना विधानसभेत डांबले
समाजाचे विटंबन तरी थांबले

बरे झाले त्यांना महाविद्यालयात कोंडले
तारुण्याच्या बहराचे विडंबन तरी थांबले

बरे झाले त्यांना लोकसभेत टांगले
देशाच्या शांततेचे अवडंबर तरी थांबले

बरे झाले त्यांना बालवाडीत घातले
पटांगणात इमारत बांधणे तरी थांबले

बरे झाले त्यामा शिकायला परदेशी पाठवले
रस्त्यावर लो ळणे, थुंकणे तरी थांबले.