म्हणाली बाटली, "तोंडास त्याच्या वास का येतो"?
सकाळी शेण खाल्ल्याचाच तो आभास का होतो?
रिकामी बाटली, निर्लज्ज भंगारात विकतो तो
खळाळा फोडतो मज बेवडा तो , दास का होतो?
जरा पोटात ती गेल्यावरी लाडात का येतो?
चणे, दाणे, मसाले खाउनी तो त्रास का देतो?
गटाटा ढोसतो वर पेटते का तीनदा बघतो
झळा त्या सोसणारी बाटली बापास दाखवतो
गुलाबी, देखण्या, भरल्या रुपावर तो फिदा होतो
तळाचा थेंब ओताया, गळा माझाच पिळतो तो
तिची आठवण आली की लगेचच बास का म्हणतो?
कधी मज ना कळे, बाई मला ती सवत का म्हणते?