असा हा सुंदर मातोश्री बंगला

मूळ:

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो! " करायला छोटासा फोन!
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा राहतो
मोत्यांच्या फुलांशी लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
- राजा मंगळवेढेकर

राहुल उवाच:

असा हा सुंदर मातोश्री बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
वाघोबाच्या डरकाळीचा आवाजच फार
नारोबाच्या दणक्यानं विरून जाईल पार

गोलमाल दादोबांचे सल्लागार दोन
"हॅलो, हॅलो! " करायला छोटासा फोन!
कृष्णकुंजी साहेबांची चाल झोकदार
दादोबांच्या नशिबात मात्र हाल हाल

बारामतीच्या शिवारात बोकोबा राहतो
वाघोबाच्या पोरांशी आट्यापाट्या खेळतो
नीच नीच दलालांचा खेळ रंगला
सत्तेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर मातोश्री बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला