सुख उपरं

कुठंही
उगवणारं
असंच 
सांदीत 
रुजलेलं 
झाड 
उंबराचं
वारसा 
मानवाला
पावित्र्याचा...
सनातन!
पान 
सुकुमार
हिरवं 
हंसरं 
निर्मळ
बाल्य
स्वप्न
आकाशस्पर्शी
नमणं 
मानवाचं!
कुठुनसा
सूक्ष्म 
एक 
षटपदी 
उपरा 
रुपला 
पानावर
कोवळ्या
माय 
असहाय्य!
शोषण 
पानाचं
पोषण 
उपऱ्याचं
उभारणं
घर 
इगलूच्या
आकाराचं
रंग 
बैंगनी 
होणारा 
लाखीलाल!
खुरटणं 
कुमाराचं
कोमेजणं
स्वप्नाचं
सुख 
किड्याचं
पोसलेलं
उपरेपणात!
घर 
उपरं 
दात्याला
खुपरं 
पण,  
औषध 
रोग्याला
नमत्या
मानवासाठी!