साबणाचं पत्र (वरदाने लिहिलेलं)

साबणाचे पत्र : दिनांक : १४-०२-२०१०.
प्रिय निरमामावशी,
विवेल नुकतीच इंग्लंडहून परत आली आणि ऍलोवेराताईची तब्येत बिघडली. तिला डॉ. डेटॉलकाकांकडे नेलं. ती आता बरी आहे.
लक्स व डवचं लग्न ठरलं आहे.   बऱ्याचदा गोदरेजकाकू आणि संतूरकाकू आमंत्रण देण्यासाठी सोप अपार्टमेंटमध्ये येऊन गेल्या.   म्हैसूर सँडलने मसुरीला जाऊन नवीन सँडलसेट घेतला.   लाईफबॉय आणि पिअर्स हे दोन मित्र तिला मिळाले.   सिंथॉल आणि हमाम नावाच्या जुळ्या मुलीसुद्धा तिला कालच झाल्या. अनुराचा वाढदिवससुद्धा कालच झाला. ती आता सात वर्षांची झाली आहे. बॉनीन नावाच्या तिचा मामाने तिला फ्रान्सहून ग्रीटिंग आणि गिफ्ट पाठवलं आहे. तुलसीसुद्धा शाळेत जाऊ लागली आहे.   हर्बल रिच आणि मेडिमिक्स यांनी नवीन घरे बांधली आहेत. ऑलिव्ह आणि रोझ हे आता रोज बालकेंद्रात आणि क्रीडागृहात जातात.   आज रात्री सोप अपार्टमेंटमध्ये पार्टी आहे. --साडेआठ ते साडेदहा. तू सुद्धा ये.   आमंत्रणासाठी तुला हे पत्र लिहिलं आहे.   चिंगबॉन आणि सावरीस अनेक आशीर्वाद.
-तुझीच (फेसाळ),
पिंगपाँग

प्रतिः

निरमा रिन व्हीलकर
पत्ता: ऍडल अपार्टमेंट, शुभ्रनगर,
सोपलँड (पश्चिम).
पिनकोड : ४००११२
फोन नंबर : २५३५२९२५.