'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. गझल तिहाई च्या वृत्तांतात नमूद केल्याप्रमाणे फेब्रुवारीत मुशायरा घेण्यात येत आहे. सर्वांना मनापासून सस्नेह आमंत्रण!
तपशीलः
मुशायऱ्याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००
स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे
संयोजन - अजय जोशी व बेफिकीर
सहभागी गझलकारः
डॉ. अनंत ढवळे
श्री. मिलिंद छत्रे
श्री. केदार पाटणकर
डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट
श्री. अजय जोशी
भूषण कटककर उर्फ बेफिकीर
प्रमुख आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ साहेब
(मी याक्षणी औरंगाबादलाच असून त्यांच्याशी भेट ठरलेली आहे. अर्थातच त्यांना आग्रहाचे निमंत्रण करणार आहे. मात्र वयामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना येणे जमले नाही तर क्षमस्व)
कार्यक्रमाची रूपरेषा:
गझल सहयोग परिचय - २ मिनिटे
सर्व शायरांचा परिचय व व्यासपीठावर आगमन - एकंदर २ मिनिटे
बशर नवाझ साहेबांचे परिचय व आगमन - १ मिनिट
भटसाहेबांच्या २ गझलांचे वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर यांच्याकडून
चक्री मुशायरा - प्रत्येकी सहा स्वरचित व मराठी गझला (प्रकाशित वा अप्रकाशित)
----------------------------------------------------------------------
श्री. चित्तरंजन व श्री. वैभव जोशी यांची काही ऑफिशियल कामे असल्याने त्यांचा सहभाग प्रत्यक्ष मुशायऱ्यात असण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यांचे आगमन झाल्यास अर्थातच त्यांच्याही गझलांचा आस्वाद घेता येईल. डॉ. समीर चव्हाण हे पुण्याबाहेर स्थित असल्याने त्यांच्या उपस्थितीस आम्ही मुकत आहोत. एका नवोदीत गझलकाराला संधी देण्यात येईल. यापुढील मुशायऱ्यांमध्ये ज्यांना गझल सादर करण्यासाठी आपला वेळ देणे शक्य आहे त्यांनी कृपया ९३७१०८०३८७ व ९९२३८२०८४२ यावर संपर्क करावा. याचे कारण आमच्याकडे सर्व क्रमांक उपलब्ध नाहीत. सुवर्णमयी उर्फ सोनाली जोशी, श्री, अनिरुद्ध अभ्यंकर व श्री. मिलिंद फणसे यांना कृपया वरील क्रमांकांवर संपर्क करण्याची विनंती!
या कार्यक्रमात कोणतीही भाषणे, सत्कार, मानधन, वर्गणी किंवा औपचारिकता नाही. प्रवेश विनामुल्य आहे.
तरन्नुम पद्धतीने गझल सादर केली जाणार नाही याची कृपया सहभागी शायरांनी नोंद घ्यावी.
(केदार - कृपया आपला बदललेला संचारध्वनी क्रमांक मला कळवा. )
---------------------------------------------------------------------------
सहभागी शायरांसाठी विनंती - कृपया आपल्या गझलांच्या प्रती bhushan20@hotmail.com वर दिनांक २०. ०२. २०१० पर्यंत पाठवाव्यात.
शायरांसाठी गझल सादरीकरणाच्या विनम्र अटी:
१. किमान पाच शेरांच्या तंत्रशुद्धच गझला असाव्यात. (संदर्भ - बाराखडी) ) ('गझल-सहयोग' ची ही स्टँडर्ड अट आहे, यात सहभागी कवींच्या हुकुमतीवर भाष्य करायचा हेतू नाही. मात्र 'गझल-सहयोग' अशुद्ध गझलांना प्रसिद्धी देणार नाही. )
२. चक्री मुशायरा असल्याने एकावेळेस एकच गझल सादर होईल.
३. गझला लिहिलेले कागद आणल्यास त्यांचे एकत्रीकरण करून पुढे एक पुस्तिका तयार करण्याची संधी राहील. तेव्हा कृपया सर्व सहा गझला लिहूनही आणाव्यात.
धन्यवाद!
'बेफिकीर'!