देताना कांदेपोहे हात कापले होते तिचे
वाटले, भीतीने होते असे कधी कधी
घालताना अंगठी बोट कापले तिचे
वाटले, आनंदात होते असे कधी कधी
बोलताना दात करकरा बाजले तिचे
वाटले, लाजण्याने होते असे कधी कधी
गळ्यात हार घालताना हात कापले तिचे
वाटले,
मी ऊंच असल्याने,होते असे कधी कधी
घास भरवताना होते नाक बरबटले माझे
वाटले, मीच जास्त 'आ' वासला
होते असे कधी कधी
माप ओलांडताना नेम होता चुकला तिचा
ती काय पेले होती, होते असे कधी कधी
काप काप कापताना प्रुथ्वी थरथरत होती
ती मात्र घोरत होती, होते असे कधी कधी
जॉनी लिव्हरचा मोबाईल कुत्र्याने गिळला होता
नेमका तो म्हणे व्हायब्रेटर मोडवर होता
तो कुत्राच म्हणे, हीच्या आईला चावला होता
म्हणून ती कापते वेळोवेळी
होते असे कधी कधी