आजचं सत्ताकारण

राज्यात किंबहुना देशात घडत असलेल्या घटना आणि त्यासाठी बर्याच अंशी कारणीभूत असलेलं राजकारण आणि सत्ताकारण, त्यामुळे सामान्य माणूस म्हणून मनात उठलेल्या विचारांच्या वादळाला या कवितेच्या रुपाने वाट करून द्यायचा एक असह्य प्रयत्न करून पाहतोय...

बाईच्या पायी घेई लोळण
आश्वासनांनी करी आमची बोळवण
'अर्थ'हीन धोरणांनी झाली खजिन्याची चाळण
महागाई उडवी आम जनतेची गाळन...

सत्तेवर कुणी ही असो फरफट आमचीच झाली
बेरजेच्या 'राज'कारणात आमचीच वजाबाकी झाली
बळी गेला बळीराजा ऱ्हीन 'बळी' चं काढून
जीव गेली मढी आम्ही वर झाडाला टांगली

बस करा आता हे मुजरे घालणं
आता तरी शिका स्वविचारानं चालणं
सोसवेना आता हे लाजिरवाणं जिनं
जमेल का या जन्मी तरी स्वाभिमानानं जगणं

यातून कुणाच्या ही भावना दुखवण्याचा कसलाही हेतू नाही. तरी कुणी ही या कवितेला वैयक्तिक पातळीवर घेऊ नये ही विनंती