आलो कुठून? - विडंबन

(श्री चैतन्य दीक्षित आणि 'नारायणाची' माफी मागून)

आलो कुठून? अन कुठे असेल जायचे?   हे नकळे  'मनसे'सही, कसे कळायचे?

उद्धवा समस्त ही धरसोड तुझ्यामुळे,   येथून किती दूर अता मी पळायचे?

आहे किती अशांत दाह या मनामध्ये,  माझे नशीब  फक्त महसूलात खेळायचे !

आलो कुठे इथे सुखे जगावयास मी? माझ्याच 'अशोकास' या मला  छळायचे!

सोसून सर्व हास्य जे असेल या मुखी, म्याडम तुमच्याच  चरणी मजला झुकायचे