विडंबन .. कविता

म्यानातून ऊसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात
_______________

द्वेषातून पसरे लोणकढी ती थाप
रागात पाडले, त्यांनी सगळे दात

ते तुटता रक्तची आले, किंचित काळे
एकूण सहा मुळातून ऊखडले गेले
हीरडीत राहिले काय? तुकडे झाले
    हबकले कायमचे शेष दात निमिषात....
    रागात पाडले, त्यांनी सगळे दात

आश्चर्यमुग्ध जीभ ती जड उचलेना
अपमान लपविण्या दात अर्पुनी त्यांना
फटक्यातच तुटले, थेट भेट काजव्यांना
    कोसळल्या दाढा, मिसळत पार मातीत...
    रागात पाडले, त्यांनी सगळे दात

खालून आग, वर राग, रक्त बाजूंनी
ओठातच रुतले सहा सात ते इमानी
जीभेने थोपवले, जोरात परी ना मानी
    मग वेगात निखळले, सोडून हिरडीची साथ
    रागात पाडले, त्यांनी सगळे दात 

चेहऱ्यावर दिसती अजून माराच्या खुणा
डोळ्यातही साकळले रक्त, वळ बुक्क्यांचा
गाल एक सुजतो, घेई वेध हल्ल्याचा
     अद्याप कळेना कुणी तोंडावर मारली लाथ
     रागात पाडले, त्यांनी सगळे दात