घडला काय गुन्हा माझा ?

घडला काय गुन्हा माझा
माते घडला काय गुन्हा माझा
सती उर्मिला विचारी कैक इला
पती विरह आयुष्यात माझ्या
का मी असा भोगावा ?

विरहाच्या त्या वेळी
काळ का नाही शहारला
आधार माझा कोणी
का ग नाही झाला ?

मानले गेले लक्षिमणाचे बंधुप्रेम
आणि सीतेची पतिव्रता
फ़क्त दुर्लिक्षले गेले मी
विसर का पडला माझा इतिहासाला ?

मला का नव्हता दिला
आदेश त्या वनवासाचा
कारण पती विरहात जिवन माझे
नव्हता का वनवासच मला?